CORONA HELPकोरोनापुणे शहर

पुणे महापालिकेचे उपायुक्त श्री. संदीप कदम यांचे वतीने शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी दिले ….

पुणे शहर :- संपूर्ण देशात व पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व झपाट्याने वाढत आहे. हा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आणि पुणे मनपाच्या प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर अहोरात्र राबविण्यात येत आहेत.

प्रशासकीय सर्व पातळ्यांवर/ स्तरावर / आघाड्यांवर जरी काम चालु असेल तरी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती/ संस्थेच्या वतीने पुणे मनपास वेगवेगळ्या पातळ्यांवर तसेच शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी मदतीचा हात मिळत असतो. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील परिमंडळ क्र. ४ चे मा. उपायुक्त, श्री. संदीप कदम यांचे वतीने त्यांचा मार्च महिन्याचे संपूर्ण वेतन र.रु. ७५,७६७/- (चेक नं. ४६९७९२ दि. २९/४/२०२१) पुणे महानगरपालिकेस मदत म्हणून मिळाले आहेत.

याप्रसंगी मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. उपायुक्त, श्री. संदीप कदम यांच्या सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती/ संस्थेच्या वतीने सहकार्य मिळाल्याने प्रशासनास किंवा शासन यंत्रणेस निश्चितच एक प्रकारची उर्जा मिळाली आहे. या राष्ट्रीय आपत्तीवर मात करण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्ती/ संस्थांनी मोलाच्या सहकार्याचा हात पुढे केलात, त्यामुळे आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितच मात करू असा मला विश्वास आहे. तसेच आपले सहकार्य व पाठबळ भविष्यातही निश्चित मिळेल याची मला खात्री आहे असे म्हणून मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मा. उपायुक्त, श्री. संदीप कदम यांचे अभिनंदन केले.

Related posts

कोरोनामुळे घरी रुग्ण दगावल्यास पालिकेकडून नवे नियम लागू

Vishal Khandagale

कोरोना’विरुद्धचा लढा जिंकू: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

ब्रेकिंग! उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX