Pune City News
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून सत्ताधारी – विरोधक आमनेसामने

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर राज्यातील अनेक नेतेमंडळी यांनी या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण काय म्हणाले?

● मराठा आरक्षणाचा आजचा निकाल दुखदायी व निराशाजनक आहे, सरकारने आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही. – देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते)

● मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. – अजित पवार (उपमुख्यमंत्री)

● मराठा आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकारने राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं व कोर्टामध्ये व्यवस्थित भूमिका मांडली नाही. – प्रवीण दरेकर, (विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते)

● मराठा समाजासाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. – विनायक मेटे (आमदार)

● सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच आता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकमेव पर्याय आहे. – उदयनराजे भोसले (खासदार)

● मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे. – चंद्रकांत पाटील

● मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मिळवून दिले. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात महाराष्ट्र सरकारला अपयश आलं – आशिष शेलार

● मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस : छत्रपती संभाजीराजे भोसले

● राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून केला – नितेश राणे (आमदार)

● मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना परत यावे लागेल – सदाभाऊ खोत (माजी मंत्री)

● आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये – रोहित पवार (आमदार)

Related posts

उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन !

Vishal Khandagale

महाराष्ट्रातील वृत्तपत्रे १ एप्रिल पासून प्रसिध्द !

Vishal Khandagale

पुणे विभागातून श्रमिक रेल्वेगाड्या रवाना !

Vishal Khandagale

Leave a Comment