महाराष्ट्र

विधानसभेत गैरवर्तन अन् भाजपच्या ‘या’ १२ आमदारांचं निलंबन

मुंबई :- सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.

  • भाजपचे ‘हे’ 12 आमदार निलंबित : पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया
  •  कारवाई का? : ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आले आहे.
  • अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव : संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार निलंबन करण्यात आलेल्या सदस्यांना वर्षभर मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

    …आणि भाजपचे आमदार आक्रमक झाले!

विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला गेला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली आणि त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. तो मुद्दा तालिका अध्यक्षांनी स्वीकारला नाही. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

दरम्यान भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली.

Related posts

तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर

Vishal Khandagale

मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात पहिल्यांदाच शुकशुकाट….

Vishal Khandagale

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा – गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX