पुणे शहरशिवाजीनगर

राजकीय गुरू रघुनाथ यमुलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे शहरातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी बड्या राजकीय गुरुला अटक करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे.

◆ रघुनाथ येंमुल असे अटक करण्यात आलेल्या राजकीय गुरुचे नाव आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

◆ “तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळे तू आमदार, मंत्रीही होणार नाहीस” अशा भूलथापा लावून संबंधित कुटुंबाला महिलेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर करण्यात आला आहे.

◆उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

◆ अटकेतील आरोपींमध्ये येंमुलचाही समावेश आहे. रघुनाथ येंमुल हा मोठा राजकीय गुरु असल्याची माहिती आहे.

◆ प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Related posts

काँग्रेस भवनमध्ये “प्रतीकात्मक होळी”

Vishal Khandagale

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पुणे पोलीस दलामधील 8 पोलीस निलंबित

Vishal Khandagale

‘प्रस्थापितांना 1 रुपयाचे उत्तर’: तुकाराम म्हस्केच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद!

Reporter pune
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX