Pune City News
कोथरूडगुन्हे विषयकपुणे शहर

खंडणी उकळणाऱ्या टोळीवर मोक्का नुसार कारवाई,

पुणे शहर :- नागरिकांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या टोळी विरूद्ध पुणे शहर पोलीसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकारची कारवाई सुरू असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. दीप्ती सरोज काळे व निलेश उमेश शेलार रा.कोथरुड यांना अटक केली आहे. टोळीतील इतर जण फरार आहेत.

दीप्ती काळे ही टोळीची प्रमुख असून गेल्या १० वर्षापासून या टोळीने कट रचून खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, बनावट व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याचे गुन्हे केले आहेत.त्याचा आर्थिक फायदा घेतला आहे.

दीप्ती काळे व इतरांवर व्यवसायिकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि एका बांधकाम व्यवसायिकास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन जमीन‌ जबरदस्तीने मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

यानंतर विश्रामबाग पोलिसांनी पूर्वीचे रेकॉर्ड व आत्ताच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर टोळीवर मोक्काची कारवाई करावी असा प्रस्ताव परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठवला होता. त्या अनुषंगाने सदरील टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ – रेस्टॉरंट असोसिएशन

Vishal Khandagale

पुणे शहरात निर्बंधामुळे 24 तासात ‘कोरोना’चे 2538 नवीन रुग्ण

Vishal Khandagale

नगररोड–वडगावशेरीत उमेदवारी दाखल

Vishal Khandagale