Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ; न्यायालयाने तिघांना ठरवलं दोषी

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.

इंदोर न्यायालयाने भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना भारतीय दंड संहिता कलम ३०६ नुसार दोषी ठरवण्यात आलंय.

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती. सुरुवातीला कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही महिने आधीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून आपण आता निवृत्त होत आहोत, असे जाहीर केले होते.

या प्रकरणी इंदूर पोलिसांनी ३ जणांना अटक केलं होतं. यात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.

गेल्या वर्षी जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

Related posts

मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली

Vishal Khandagale

30 मार्चऐवजी 30 जूनला संपणार आर्थिक वर्ष; आरबीआयचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एवढ्यात’ रुपयांत शिवभोजन

Vishal Khandagale