महाराष्ट्र

राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांना संधी मिळाली आहे.

सध्या संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंह परदेशी आणि सिताराम कुंटे यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस होती.

त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते. अखेर, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सिताराम कुंटे यांची या पदासाठी वर्णी लागली आहे.

त्यांच्या जागी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांना संधी मिळाली आहे.

दरम्यान, येत्या नोव्हेंबरमध्ये कुंटे निवृत्त होणार आहेत. त्यामुळे, नवीन मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचा असणार आहे.

Related posts

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम !

Vishal Khandagale

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी नियमावली

Vishal Khandagale

कोरोना : कुलगुरू आयसोलेशन वार्डमध्ये !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX