Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी : प्रकाश जावडेकर

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे.

त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले.

पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीला लोक प्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधांना कोरोनाच्या काळात कोणत्या यंत्रणेकडे कोणती जबाबदारी दिली आहे, याबाबत माहिती द्या. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहिम अतिप्रभावी करा, अशा सूचना पवार यांनी केल्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मेगाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु आहे. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. असेही टोपे यांनी सांगितले.

Related posts

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

‘महाराष्ट्रात आणखी आठ स्पेशल ट्रेन

Vishal Khandagale

शिष्यवृत्तीसंबंधी वेबिनारचे आयोजन-DMI

Vishal Khandagale

Leave a Comment