Uncategorized

विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यावर छापा, 23.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश असताना वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावर छापा टाकत तब्बल 23 लाख 73 हजार 845 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी वाघोली ते केसनंद जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन थांबवले.

वाहन चालकाचे नाव कपिल दिगंबर शाहू (वय 26) असे असून तो केसनंद, हवेली (पुणे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. चौकशीत त्याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान पिकअप वाहनातून 7,441 बाटल्या विदेशी दारू जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 16,73,845 रुपये आहे. तसेच MH 38 AS 2822 क्रमांकाचे पिकअप वाहन (किंमत अंदाजे 7 लाख रुपये) जप्त करण्यात आले. एकूण 23,73,845 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related posts

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

Vishal Khandagale

मानवतेच्या जाणिवेतून राबवित असलेला ‘डिक्की’चा उपक्रम स्तुत्य

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX