कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

निवडणूक काळात दारू व अंमली पदार्थांचा साठा जप्त; 69 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत



पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत पुणे महानगरपालिका व पुणे पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दारू, अंमली पदार्थ व इतर प्रतिबंधित साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.


महापालिकेच्या MCC-II Revised Format (पुणे पोलिस) अहवालानुसार, या कालावधीत एकूण 69,63,050 रुपयांचा रोख मुद्देमाल, तर 8,124.11 लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मद्याची अंदाजे किंमत 11,07,950 रुपये इतकी आहे.
याच कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ देखील हस्तगत करण्यात आले असून त्यामध्ये


MD (126 gm), गांजा (3 kg 947 gm), अफू (7 kg 286 gm), नशेच्या गोळ्या (212), चारस (57 gm 780 mg) यांचा समावेश आहे. या अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे 26,84,729 रुपये इतकी असल्याची नोंद आहे.


या प्रकरणात BNSS कलम 126, 128, 129, 437 तसेच NDPS Act अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून 06 दखलपात्र व 10 अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत प्रमाण क्रमांक 1 ते 41 इतक्या प्रकरणांची नोंद आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित स्वतंत्र अहवालानुसार, याच कालावधीत 16,181.68 लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 29,60,036 रुपये इतकी आहे. या विभागाच्या कारवाईत अंमली पदार्थ किंवा गुन्हे दाखल प्रकरणांची नोंद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.


निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Related posts

कामगार पुतळा येथील झोपडपट्टीची जागा मेट्रो घेणार ताब्यात; सोमवारपासून होणार कार्यवाही

Vishal Khandagale

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

भीमा कोरेगाव – विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने साजरा करुया : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX