▪️ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अंगारकी चतुर्थी येत्या मंगळवारी ( दि.२ ) मार्च रोजी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर दर्शननासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
▪️ हा निर्णय दगडूशेठ गणपती ट्रस्टने घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
▪️ अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी मोठ्या लाखोंच्या संख्यने भाविक येतात.
▪️ त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
▪️ अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.
▪️ भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

