पुणेराष्ट्रीय

अदर पुनावाला सीईओ सिरम इन्स्टिट्यूटचे यांनी घेतली कोरोनाची लस

कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण आज देशभरात होत आहे. सिरम इस्टिट्यूटकडून संपूर्ण भारतात या लसीचे वितरण करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी देखील आज कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

दे शाच्या इतिहासात हा एतिहासिक दिवस म्हणून ओळखला जाईल. कोव्हीशिल्ड लसीचे कोव्हीशिल्ड लसीकरण हे जगातले सर्वात मोठे लसीकरण होत आहे. त्यामुळे हा इतिहासातला सर्वात मोठा दिवस म्हणून गणला जाईल.

आदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे की, देशात सुरू झालेले सर्वात मोठे लसीकरण ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि यात कोव्हिशिल्ड लसीचा सहभाग आहे, ही बाब आमच्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचे पूनावाला यांनी सांगितले आहे.

तसेच या लसीची परिणामकारकता आणि सुरक्षा दर्शविण्यासाठी आपण देखील आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लस घेत आहोत, असे पुनावाला यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे.

Related posts

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Vishal Khandagale

श्रीक्षेत्र तुळापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध : भुजबळ

Vishal Khandagale

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात संतापातून तोडफोड !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX