अन्याय अत्याचाराच्या आणि गुलामीच्या स्मृती जतन करण्यापेक्षा आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण झालेच पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारने निर्णय घ्यावा संभाजी ब्रिगेडचे संपूर्ण समर्थन असेल, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक मा. विकास पासलकर यांनी केले. आज पुण्यातील डेक्कन परिसरात आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या 341 व्या राज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त संदीप कदम, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे माजी अधिकारी भैय्यासाहेब देशमुख, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, मयूर शिरोळे, मंदार बहिरट, सचिन जोशी, मराठा टायगर फोर्सचे संदीप लहाने पाटील, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर विराज तावरे यांनी आभार मानले.

