Pune City News
महाराष्ट्र

आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : फडणवीस

Pune City News:- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

▪️ एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने मंत्र्यांच्या घरी नेऊन आणि मंत्र्यांच्याच उपस्थितीत बेदम मारहाम करणे अतिशय गंभीर घटना आहे.

▪️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला, तर त्याविरुद्ध आवाज उठवण गैर नाही.

▪️ न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्य अस्तित्वात राहणार नाही.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Vishal Khandagale

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Vishal Khandagale

Leave a Comment