Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट

Pune city News:- कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट (सामना) कोवीड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड 19 अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाही, कोरोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहिती, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना या सर्वाची एकत्रित, अधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे.

यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने www.mahainfocorona.in या संकेतस्थळाची (वेबसाईट)ची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले झाले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड 19 च्या खात्याची माहितीही देण्यात आली असून या खात्याची क्यूआर कोडही येथे देण्यात आली. जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल.

Related posts

मुंबईच्या फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला

Vishal Khandagale

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

कोरोनाचा अर्थव्यवस्थेला झटका !

Vishal Khandagale

Leave a Comment