Pune City News:- महिन्याभरापुर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तीन अल्पवयीन मुलांसह संबंधित महिला साडेसतरानळी, हडपसर येथील दांगट वस्तीमध्ये मोलमजुरी करुन राहते आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मोलमजूरी बंद असल्याने संबंधित महिलेला लॉकडाऊनच्या परिस्थितीत अक्षरक्षा भीक मागत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, परंतु कोरोना संसर्ग रोगाच्या भितीने व सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी तिने घरीच थांबण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित कुंटुबांची उपासमार होऊ लागली.त्यामुळे माणुसकीच्या नात्याने कोणीतरी संबधित कुंटुबास मदत करा. अशा आशयाचा मेसेज सोशल मिडीयावर व व्हाटसअपवर व्हायरल झाला. याबाबत पुणे जिल्ह्यातील एका महिला सामाजिक कार्यकर्त्या यांनी याबाबत हवेली तालुका पत्रकार संघातील सदस्यांना याविषयी माहिती देऊन मदत करणेकामी विनंती केली. मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पत्रकारांनी संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून शाहनिशा करुन त्यांची अडचण व उपासमार समजून घेऊन त्यांना मदत पोहोचवण्याचे आश्र्वासन दिले.त्यानंतर तातडीने हवेली तालुक्याचे तहसीलदार सुनील कोळी व प्रांताधिकारी सचिन बारवकर यांना फोनवरून संबंधित प्रकार कळवण्यात आला व त्यांनीही ताबोडतोब मदतीचे आश्वासन दिले. प्रांताधिकारी व तहसीलदार यांना फोन झालेनंतर फक्त वीस मिनिटांताच मंडल अधिकारी व्यंकटेश चिरुमुल्ला, तलाठी राजेश दिवटे यांनी संबंधित महिलेच्या घरी आठवडाभर पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुर्पुद केला. या मिळालेल्या मदतीने अंचबित झालेल्या विधवा महिलेच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याने तिने आपल्या आश्रूंना मोकळी वाट करून दिली. भावना यावेळी संबंधित विधवा महिलेनी व्यक्त केली.
previous post

