Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना : ParleG देणार 21 दिवस आधार !

Pune City News :- कोरोना विषाणू च्या सुरक्षिततेविषयी देशात लॉकडाउन लागल्यामुळे हातावर पोट भरणारे कामगार नागरिक अडचणी आले आहेत. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन झाला. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्यांनाच यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे इतरांच्या रोजगारावर संकट आली आहे. ज्याचं पोट हातावर आहे, अशांच्या मदतीसाठी पारले जी कंपनीनं पुढाकार घेतला आहे.

देशभर २१ दिवसांच्या लॉकडाउनला सुरुवात झाली. या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे होत आहेत. सकाळी कमवायचं आणि रात्री खायचं अशी उपजिविका करणाऱ्यांनी आता करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. अशा गरीब लोकांसाठी मदतीचं आवाहनही करण्यात येत आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पारले-जी कंपनीनं मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी पुढच्या तीन आठवड्यात तब्बल 3 कोटी बिस्किट पाकिटांचं वाटप करणार आहे.

संचारबंदीच्या काळात दर आठवड्यात १ कोटी अशा प्रकारे तीन आठवड्यात 3 कोटी पाकिटांचं वाटप करणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सरकारच्या मदतीनं गरजू लोकांना याचं वाटप करण्यात येणार आहे.

Related posts

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण ‘ड्राईव्ह’ या दोन दिवशी होणार- महापौर

Vishal Khandagale

पुणे शहरातील व्यापार बंद!

Vishal Khandagale

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे : राज्यातील जनतेशी संवाद!

Vishal Khandagale

Leave a Comment