पुणे

कोरोनाच्या विनाशाकरीता ‘दगडूशेठ’ गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक

कोरोनाच्या वैश्विक चे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले.

तसेच ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला. सलग १५ दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देखील करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ढुंडीराज तथा अधिक मासानिमित संकष्टी चतुर्थीला गणेशाला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचनासह महागणेश याग करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी सुरु आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग, विशेष अभिषेक राजोपचार व एकविंशती आवरण पूजन आणि सहस्त्रदुर्र्वाचन मंदिरात करण्यात आले.

कोरोनाच्या जागतिक महामारीचे निवारण करण्याकरीता व जनकल्याणार्थ सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरीता आणि गणेश कृपा होण्याकरीता माता सिद्धी-बुद्धी यांच्याकडे संकल्प देखील करण्यात आला.

तसेच नग्नभैरवाकडे सगळ्या दुष्ट शक्तींचा नायनाट करण्याकरीता आवाहन करण्यात आले.

Related posts

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता १५ सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

Vishal Khandagale

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशिअल ऑडिट होणे आवश्यक; आबा बागुल

Vishal Khandagale

कोरोना: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील तपासणी अहवाल

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.