जेईई ऍडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल आज( सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये पुण्याच्या चिराग फलोर याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या परीक्षेसाठी एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थी बसले होते. पेपर १ आणि २ साठी ४३ हजार २०४ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले होते.
चिराग हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर आला आहे. त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. तर आयआयटी रुरकी झोनमधील कनिष्क मित्तल ही रँक लिस्टमधील १७व्या क्रमांकासह विद्यार्थिनींमध्ये अववल आली आहे.
गेल्यावर्षीही जेईई परीक्षेत महाराष्ट्रामधलाच टॉपर होता. त्यानेही ३७१पैकी ३४६ गुण मिळवले होते.

