पुणे

चिमुकली ला कोणीतरी झुडपात टाकले…..

PUNE CITY NEWS :-  आज सायंकाळी पावणे सहा वाजता चांदणी चौकातील उतारावरील .कोथरुडच्या दिशेने जाणाऱ्या उताराच्या रस्त्याच्याकडेला भागात नागरीकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तेथेच असलेल्या वाहतूक पोलिसांना सांगितले.वारजे वाहतूक विभागामध्ये पोलिस हवालदार असलेले सुरेश शिंदे व पोलिस शिपाई सुजय पवार हे दोघेही त्यांच्या सहकाऱ्या समवेत गुरुवारी चांदणी चौकात वाहतूक नियमन करीत होते.

त्यामुळे ते दोघेही धावतच तेथे गेले. त्यावेळी कपडयात बांधलेले चिमुकली पावसातच कोणीतरी सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनीही बाळाला उचलून घेत आपल्या कवटाळले. ते भुकेने व्याकुळ झाल्याचे पाहुन पोलिसांनी लगेचच त्याच्यासाठी दुधाची व्यवस्था केली.

घोडके म्हणाले की, ”चार महिन्याची ही मुलगी असून आम्ही या बाळाला ससूनमध्ये दाखल करणार आहोत. नागरीकांना या बाळाबद्दल काहीही माहिती असल्यास कोथरुड पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक, इतरांकडून काही माहिती मिळते का याचा शोध घेत आहोत.

याविषयी वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक के. एस. लोंढे म्हणाले, “पवार व शिंदे यांनी त्यांना सापडलेल्या बाळाची माहिती कोथरूड मार्शला दिले. त्यानंतर पोलिस बाळाला घेऊन कोथरुड पोलिस ठाण्यात गेले आहेत. तेथे बाळाला रस्त्यावर सोडुन जाणाऱ्या त्याच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.”

Related posts

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

BDP जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी 

Vishal Khandagale

हर्षवर्धन जाधव यांची येरवडा कारागृहात रवानगी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX