पुणेवडगावशेरी

संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते !

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या प्रयत्नातून  व आमदार सुनील टिंगरे यांच्या सहकार्यातून (अग्रसेन शाळा ते ई-कॉमर्स e-commerce चौक रस्त्याचे) संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. येरवड्यातील ई-कॉमर्स झोन चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका फरझाना शेख, शीतल सावंत, संपर्कप्रमुख अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रभाग दोन मधिल अग्रसेन शाळा ते ई-कॉमर्स e-commerce  रस्त्यातचे बालग्राम मधिल भूसंपादन अभावी रखडलेले काम मार्गी लागले तसेच महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पा  मधे २ कोटी ची तरतूद करून टेंडर मान्य होउन . लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यास मदत होईल.

मा आठवले साहेब यांनी विकास काम करत असताना पक्षीय मतभेद विसरुन जनते च्या हिताचे कार्य सर्वानी मिळुन करावे हा संदेश दिला.

आमदार सुनिल टिंगरे यांनी प्रभागात चारही नगरसेवक जनते च्या प्रश्नावर एकत्र येऊन काम करतो व भविष्यात हि एकत्र काम करु हे सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरा मधे PUNE METRO मेट्रो  प्रकल्प, नदी सुधार योजना , जायका प्रकल्प , स्वच्छ भारत मिशन व करोना  काळात केलेले कार्य हे सर्व पुणेकर यांच्या करिता व त्यांच्या सहकार्या मुळे होत आहेत हे सांगितले.अल्पसंख्याक आघाडीचे अँड. अयुब शेख यांनी आभार प्रदर्शन केले..

Related posts

जागतिक परिचारिका दिनानिमित्त विभगीय आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा !

Vishal Khandagale

कै. सौ. हिराबाई गलांडे फ़ाऊंडेशन व भाजपाच्या वतीने “इमर्जंसी ऑक्सिजन किट” वाटप !

Vishal Khandagale

आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX