पुणे

जम्बो कोविड रुग्णालयात केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश

जम्बो कोविड रुग्णालयात प्रमाणित केंद्रीय पद्धतीने रुग्णांना प्रवेश देण्यात येत आहे.

यासाठी पुणे महापालिकेची कोविड बेड हेल्पलाईन किंवा इतर कोविड रुग्णालयांच्या संदर्भानेच प्रामुख्याने प्रवेश देण्यात येत आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास ट्राएज रुममध्ये डॉक्टर रुग्णांना स्थिर करून पुढील उपचारांची रुपरेषा ठरवतात.

नोंदणी करून रुग्णांना संबंधित वॉर्डमध्ये प्रवेश देण्यात येतो. वाढते रुग्ण लक्षात घेऊन ज्यांना निरीक्षणाखाली ठेवून उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक आहे.

त्या दृष्टीने प्रवेश देण्यासाठी सर्वत्र स्वीकारली जाणारी ही केंद्रीय पद्धत अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

Related posts

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते !

Vishal Khandagale

उंड्री, होलेवस्ती “Micro Containment Zone “पहा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX