Pune City News
पुणेराष्ट्रीय

देशात आढळला दुसऱ्यांदा कोरोना झालेला रुग्ण

मागील काही दिवसांपासून देशात 80 ते 90 हजारांच्या दरम्यान रुग्ण सापडत असून, आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

देशात दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयानं दुसऱ्यांदा कोरोना झालेला रुग्ण आढळून आल्याचा दावा केला आहे. बंगळुरूतील हा पहिलाच रुग्ण असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे.

बंगळुरूतील फोर्टीस रुग्णालयानं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार 27 वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेमध्ये जुलैमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली होती. महिलेला ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता.

त्यानंतर महिला उपचाराच्या साहाय्यानं कोरोनातून बरी झाली. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

मात्र, एका महिन्याच्या कालावधीनंतर त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, असा दावा रुग्णालयानं केला आहे.

Related posts

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

अमेरिकेत 25 फुटांची हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना !

Vishal Khandagale

रस्ता पेठ- मद्रासी गणपतीजवळ इमारतीला आग

Vishal Khandagale

Leave a Comment