पुणे

नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी मंडळाची पुणे स्मार्ट सिटीला भेट

मुंबई येथील नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासाच्या तीन-सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी( दि.२८) रोजी पुणे स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व आर्ने जान फ्ललो, वाणिज्य दूत करत होते.

यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी संजय कोलते आणि अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यामध्ये आयसीटी तंत्रज्ञान, स्मार्ट इलेमेंटस, स्मार्ट स्ट्रीट, पायाभूत सुविधा आणि प्लेसमेकिंग प्रकल्पांसह स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी शिष्टमंडळाला माहिती दिली.

या प्रकल्पांमधील नाविन्यपूर्ण बाबी व प्रकल्पांचे नागरिकांना होणारे फायदे सांगितले. प्रतिनिधींनी विशेषत: ई-बस प्रकल्प, मेरा थेला आणि सेफ्टीपिन आप्लिकेशन इत्यादी प्रकल्पांमध्ये उत्सुकता दर्शविली, जे नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करीत आहेत.

यावेळी आर्ने जान फ्ललो यांनी सांगितले की, नॉर्वे हा विद्युत वाहनांच्या अंमलबजावणीमध्ये अग्रगण्य देश आहे. यासंदर्भात सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

अशा प्रकारच्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि धोरणात्मक बाबी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळाने असेही सुचवले की, ते विचारांचे आदान प्रदान करण्यास आणि त्यांचे अनुभव सांगण्यास दूतावास तयार आहे. यामुळे शहरांमध्ये विविध सुविधा विकसित करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

पुणे शहरात कोरोनाचे तीन बळी….

Vishal Khandagale

जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय सुविधांची वानवाच -आमदार सिद्धार्थ शिरोळे

Vishal Khandagale

शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांना अभिवादन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX