Pune City News
कोरोनापिपरी चिंचवडपुणे

हवेली तालुक्यातील आठ तासांत बंदी हटवली ; ये- जा करण्यास परवानगी

PUNE CITY NEWS

पुणे व पिंपरी चिचवड शहरातुन या गावांना कोरोना विषाणु प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आज (शनिवार) पहाटे पाच वाजल्यापासुन येत्या शुक्रवारी (दि. 12 ) रात्री बारा वाजेपर्यत, अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात शनिवारी ( दि. 6 ) पहाटेपासुन ये -जा करण्यास घालण्यात आलेली बंदी आठ तासांच्या आत हटवावी लागली आहे. वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, ही बंदी उठवण्यात येत असल्याची घोषणा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे.
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारचे शासकीय, प्रशासकीय व खासगी अधिकारी व कर्मचारी यांना आज (शनिवार) पासुन सात दिवस, वरील चार गावात येजा करण्यास बंदी घातली होती. मात्र, वाघोली व मांजरी बुद्रुक या दोन्ही गावात सकाळपासुनच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच, बारवकर यांनी वरील आदेश रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.
कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, वाघोली, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील आठ ठिकाणचा कंटेन्मेट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) शनिवार ( दि. 6 ) पासुन हटविण्यात आला आहे. यामुळे वरील आठ गावात दुकाने, खासगी कार्यालय व व्यापारी दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.

Related posts

फिनिक्स मॉल मध्ये लागली “आग”

Vishal Khandagale

‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊनची नियमावली जाहीर !

Vishal Khandagale

टाळेबंदीबाबत चा निर्णय 3 मे नंतरच होणार !

Vishal Khandagale

Leave a Comment