पुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची आज वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरे, झाडे, विजेच्या खांबाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे.

भांबर्डे व नुकसानग्रस्त गावांतील परिस्थितीची पाहणी करुन येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले. यानंतर बोलताना मंत्री श्री.अस्लम शेख म्हणाले, चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पत्रे व छप्पर उडून गेले आहेत. नुकसानग्रस्त घरांवर लवकरात लवकर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत केरोसीनचा पुरवठा करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच लोकांना जेवणाच्या साहित्याचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे विजेच्या खांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

श्री.शेख यांनी केलेल्या पाहणी दरम्यान मुळशी तालुका तहसिलदार अभय चव्हाण, मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय उपायुक्त  श्री. देशपांडे, भांबर्डे गावचे सरपंच, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा

Vishal Khandagale

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : डॉ. राजेश देशमुख

Vishal Khandagale

पुण्यात ६५ कंटेन्मेंट झोन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX