Pune City News :- शहरासह, उपनगरात फळ आणि पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते भाज्या महाग विकत आहेत.
सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले असून बहुतांश फळभाज्यांच्या किलोच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर काही भाज्यांचे दर 150 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
पालेभाज्यांच्या गड्डीचे दर 50 ते 30 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. वाढलेल्या दरामुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केटयार्डातील अडते आणि कामगार संघटनांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी बाजार बंद ठेवला होता. त्यामुळे सोमवारी बाजारात अत्याअल्प आवक झाली होती.
सतत चार दिवस भाज्यांची आवक न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दराने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
previous post

