Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार

aj

पुणे- प्रतिनिधी :- जिल्ह्यात ‘कोविड-19’ आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

‘कोविड व्यवस्थापनाबाबत आज( शुक्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्ती अभावी बंद राहू नयेत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच कोविड रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी खा. वंदना चव्हाण, आ. सर्वश्री अशोक पवार, राहूल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अण्णा बनसोडे, सुनील कांबळे, आदी लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या.

सध्या बेडची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना वेळेत बेड उपलब्ध होत असल्याचे सांगितले. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

Related posts

दुहेरी हत्याकांडाने दापोडी हदरले !

Vishal Khandagale

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याच्या सूचना

Vishal Khandagale

जम्बो कोविड रुग्णालयात आवश्यक सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा; आरोग्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment