गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

पुणे- प्रतिनिधी :- काही दिवसांपूर्वी देहू रोड परिसरात एक पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले होते. त्या हत्येचे गूढ उकलले असून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

  •  रितू गायकवाड ( वय २०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर खून केलेल्याचे मयूर गायकवाड असे नाव आहे.
  •  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिचा पती मयूर सोबत राहायचे नसल्याचे तिने अनेकदा आपल्या आणि मयूरच्या कुटुंबियांना सांगितले होते.
  •  तसेच तिला त्यांच्या नातेवाइकाच्या मुंबई येथील मुलाशी लग्न करायचे होते. मात्र, तिचे कुणी एकूणच घेत नव्हते. त्या रागातूनच आपण मयूरची हत्या केल्याचे आरोपी महिलेने सांगितले आहे.
  •  आरोपी महिला ही पोलीस कोठडीत असून, तिला पतीच्या हत्येत मदत करणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शेजाऱ्याने मृताच्या भावाला फोन करून माहिती दिली. घरात तुझ्या भावाची हत्या झाल्याची माहिती शेजाऱ्याने त्याला दिली.
  •  मृताचा लहान भाऊ ओमकार गायकवाड हा स्थानिक रुग्णालयात काम करतो. घटना घडली त्यावेळी आई रात्रपाळीला गेली होती. तर ओमकार हा मित्रासोबत होता.
  •  घरी परतल्यानंतर भाऊ हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. भावाच्या तक्रारीवरून देहुरोड पोलिसांत महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून महिलेला अटकही करण्यात आली आहे. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related posts

फरासखाना पोलीसांकडून बंगाली सोने कारागिरांना अन्नधान्याचे वाटप !

Vishal Khandagale

पोलिसांनी केला ७ किलो गांजा जप्त !

Vishal Khandagale

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX