गुन्हे विषयकपुणे

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Pune City News :- लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करुन दिवस-रात्र खडा पहारा देणाऱ्या पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांच्या संकल्पनेतुन “मोबाईल क्लिनिक” सेवा आजपासून हडपसर परिसरात सुरू करण्यात आले.

याचा प्रारंभ खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हडपसरमधील गाडीतळ परिसरातील पोलिसांची तपासणी करण्यात आली.साधारणतः गेल्या महिनेभरापासून रस्त्यावर बंदोबस्त करताना स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या या पोलीस बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांची ‘जगदंब प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि नोबल हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोबाईल क्लिनिक सेवा सुरू केली आहे.

Related posts

कोरोना : पुण्यातील भोजनालयाला व रेशन वाटप केंद्राला भेटी : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारविश्व सर्वांसाठी मार्गदर्शक – कुलगुरु

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX