Pune City News
महाराष्ट्र

मजुरांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न करु नये : गृहमंत्री अनिल देशमुख

Pune City News :- राज्यात कोरोना विषाणू च्या वाढत्या संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये. ते आहेत तिथेच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल,असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाउनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरीत मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी आहे तिथेच रहावे. शासनातर्फे सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची आम्ही हमी देतो.
फक्त आपले राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी गावी जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना वाटेतच अडविले जाईल. इतकी पायपीट करुन गावात जाऊनही गावातील लोकांनी प्रवेश न दिल्यास आपल्यावर अधिक कठीण प्रसंग ओढवू शकतो. कोरोनाच्या साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढणार, याची जाणीवही गृहमंत्र्यांनी करुन दिली आहे.

Related posts

…तर सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का ? : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण

Vishal Khandagale

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केल्या अनेक मोठ्या घोषणा

Vishal Khandagale

Leave a Comment