Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

पुणे शहर व पिंपरी चिंचवड ‘ला’ जोडणारे पूल बंद !

Pune City News :- कोरोनो विषाणू चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव- दापोडी हा पवना नदीवरील रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. तसेच सांगवी-दापोडीला जोडणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर प्रशासनाकडून संचारबंदीचा फलक लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत दापोडी भाग सील असूनही नागरीकांचा या दोन्ही रस्त्यावरून वावर सुरू होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पुण्याकडे रहदारीसाठी आता पुणे मुंबई मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

दापोडी येथे रेल्वेगेट भाजी मार्केटमधे अजूनही नागरिकांकडून भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर अंतर्गत गल्ल्यांमधून येथील बॉम्बे कॉलनी, वरची आळी, भिकनशेठ पार्क महादेव आळी, अशा गल्ल्यांमधून फेरीवाल्या भाजी विक्रेत्यांकडून भाजी विक्री होत असल्याचे सांगण्यात येत आहे.संचारबंदी करूनही नियमांची पायमल्ली करत मोकाट फिरणाऱ्यांचा वावर सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts

पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांची बदली

Vishal Khandagale

“श्रीं” ची प्राणप्रतिष्ठापणा प्रथमच अध्यक्ष, पदाधिकारी करणार

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवड मध्ये ” COVID-19 TEST BUS” दाखल !

Vishal Khandagale

Leave a Comment