भारतात प्रथमच कारागृह-पर्यटन सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. याविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
पुण्यातील येरवडा तरुंगामध्ये येत्या २६ जानेवारीपासून पर्यटनाचा हा अनोखा प्रकार सुरू होणार आहे.
राज्यातील पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. तुरुंगामध्ये बंदिवान असेलल्या कैद्यांचे आयुष्य आणि तिथले वातावरण अनुभवण्याची संधी सामान्य माणसांना मिळणार आहे.
पर्यटनाच्या विविध प्रकारांबरोबरच राज्यात कारागृह पर्यटनाला सुरुवात होणार आहे.
भारतात अशा प्रकारचे पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहामधून या पर्यटनाला सुरुवात होईल.
येत्या २६ जानेवारीला दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पर्यटनाला सुरुवात होणार आहे.

