पुणे

बेपत्ता मुलीच्या शोधार्थ आईवडिलांचे जम्बो कोविड रुग्णालयासमोर आंदोलन

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा बेपत्ता झाली असून तिचा शोध लागावा म्हणून मुलीचे आई वडिल रागिणी आणि सुरेंद्र गमारे यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसमोर आज ( गुरुवार) पासून आंदोलन सुरू केले आहे.

महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता आई वडिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोविड सेंटर प्रशासनाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे.

या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे हे देखील उपोषणात सहभागी झाले आहेत.

गमारे यांची मुलगी प्रिया तानाजी गायकवाड( वय ३३) ही २९ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर तिला ससून हॉस्पिटलमार्फत शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या महिलेविषयी उलट-सुलट माहिती देऊन खरी माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी तसेच अद्याप पर्यंत सदर महिला आढळून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे.

याबाबत मुलगी ऍडमिट आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे वेळोवेळी सांगून डिस्चार्जच्या वेळेला मात्र मुलगी आमच्याकडे ॲडमिट नाही, असे सांगून फसवणूक करत आहे. म्हणून जम्बो कोविड प्रशासनाविरोधात हे उपोषण करण्यात येत असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Related posts

“जनता कर्फ्यु” मधे वाढ : जमाव बंदी कडक !

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

48 हजार डोस उपलब्ध ; येथे होणार लसीकरण

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX