पुणे

बोपोडी – गोदाई सोशल फाउंडेशन कडून शिधा वाटप !

Pune City News:- कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव मूळे
पुणे शहरामध्ये शासनाकडून टाळेबंदी करण्यात आले आहे. गोरगरिबांना मदत नव्हे; कर्तव्य समजून व कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असो,आपत्तीजनक परिस्थितीमध्ये गोदाई सोशल फाउंडेशन संस्थापक मा.विनोद(दादा) दादासाहेब रणपिसे. सर्वात पुढे असतात व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून,समाजातील दुर्बल/दुर्लक्षित गरजू लोकांसाठी नेहमी तत्पर असतात.

तसेच तथागत गौतम बुद्ध पौर्णिमे चे औचित्य साधून औंध बोपोडी विभागातील हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांसाठी,परप्रांतीय मजुरांसाठी,तसेच बाहेरील विद्यार्थ्यांसाठी गोदाई सोशल फाउंडेशन तर्फे ५३५ गरजूवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या मध्ये किट मध्ये २ किलो गहू , १.५ किलो तांदूळ , अर्धा किलो साखर , अर्धा लिटर तेल , अर्धा किलो तूरडाळ , ५० ग्रॅम हळदी , ५० ग्रॅम मसाला , चहापती पाकीट , साबण , अर्धा किलो कांदे , अर्धा किलो बटाटे .अशा प्रकारे राशन किट चे वाटप करण्यात आले…!!!

Related posts

…तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

Vishal Khandagale

बाणेर कोविड रुग्णालयाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Vishal Khandagale

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX