पुणे

मनसेच्या वतिने ‘मी मराठी- माझी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम

२७  फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थातच मराठी राज्यभाषा दिन मनसेच्या कोथरूड गड या कार्यालयाजवळ मराठी राजभाषा दिन

‘मी मराठी… माझी स्वाक्षरी मराठी…’ 

साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

कोथरूड परिसरातील असंख्य नागरिकांनी उस्फूर्तपणे कुटुंबासह येऊन मराठी भाषेमध्ये आपली स्वाक्षरी नोंदवून या कार्यक्रमाला उपस्थिती लावत मराठी भाषेचा अधिकाधिक जागर करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे यांनी सर्वप्रथम मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

Related posts

पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा

Vishal Khandagale

कोरोना: पुणे लष्कर हद्दीत उपाययोजना निर्देश!

Vishal Khandagale

पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX