पुणे

गहुंजे स्टेडियम – भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यांना परवानगी

भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार की नाही याबाबतची अनिश्चितता संपली आहे.

पुण्यातील महाराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर भारत- इंग्लंड दरम्यान खेळले जाणारे सामने खेळविण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनामुळे प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार नाही. प्रेक्षकांविनाच हे सामने खेळविले जाणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्नींग कौन्सिलचे अध्यक्ष मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. नियोजनाप्रमाणे पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत.

Related posts

सासवड येथे जुगार अड्ड्यावर छापा; ३० जण ताब्यात

Vishal Khandagale

आंबेगाव खुर्द “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) व किरण भालेराव यांच्याकडून अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX