पुणे

महानगरपालिकेकडून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत १ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आज पंधरा क्षेत्रीय कार्यालयातील ४२ प्रभागांमध्ये सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान हे अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सुनील कांबळे, नगरसेविका मंगला मंत्री, राजेश येनपुरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विलास कानडे, उपायुक्त विजय दहिभाते, माधव जगताप, सहाय्यक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या अभियानाच्या अंतर्गत सार्वजनिक रस्त्यांचे झाडणकाम करणे, डिव्हायडरच्या कडेला असलेली माती उचलणे, भिंतीपत्रके काढणे, डिव्हायडर व फुटपाथ स्वच्छ करणे, वाढलेले गवत काढणे, अस्ताव्यस्त स्थितीतील बॅनर काढणे, फ्लायओव्हर खालील जागेची स्वच्छता करणे, फेरीवाल्यांचे आणि दुकानांचे कचऱ्याचे नियोजन करणे, ड्रेनेज साफसफाई करणे, बंद अवस्थेतील गाड्या उचलणे या प्रकारची कामे करण्यात आली.

Related posts

भाजपा च्या नगरसेविकेने उभारले मजुरांसाठी अन्नछत्र !

Vishal Khandagale

खेड शिवापूर टोल नाक्यावर चाकरमानी व पर्यटक बेहाल !

Vishal Khandagale

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX