Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

पीएमपीएल बस सुरु करण्याची मागणी : औद्योगिक विकास मंडळ अध्यक्ष

Pune City News:- सरकारने ३३ टक्के कामगारांसह लघु व मध्यम उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, दुचाकी वापरण्यास कामगारांना बंदी करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत. यासाठी औद्योगिक क्षेत्रात पीएमपीएल बस सेवा सुरु करावी, अशी मागणी पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ अध्यक्ष गोविंद पानसरे यांनी केली आहे.

याबाबत पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड भागातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पुरुष कामगारांबरोबर महिलांची संख्या लक्षणीय आहे. इतर सार्वजनिक वाहने कामगारांसाठी उपलब्ध नाहीत. लघु व मध्यम उद्योजक वाहन सुविधा उपलब्ध करण्यास आर्थिकरित्या सक्षम नाहीत. त्यामुळे महिला व कामगारांची मोठी गैरसोय होत आहे.

संघटना व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पूर्ण सर्व्हे करुन कामगारांची संख्या, ब्लॉकवाईस मार्गाचा नकाशा पिंपरी व चिंचवड भागातील पूर्ण तपशीलवार माहिती नकाशासहित पीएमपीएलएमच्या सर्व अधिकार्‍यांना दिलेली आहे. आत्पकालीन परिस्थितीत या मागणीस न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Related posts

पुणे शहर पोलिसांचा माणुसकीचा “डिजिटल पास”

Vishal Khandagale

आळंदी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर !

Vishal Khandagale

पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा-उप-मुख्यमंत्री पवार

Vishal Khandagale

Leave a Comment