Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच; एम्सकडून शिक्कामोर्तब

सुशांतसिंह राजपूत केसमध्ये तपासणी करणाऱ्या एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्त केला आहे.

या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्येनेच झाल्याचं म्हटलं आहे.

डॉ. गुप्ता म्हणाले:-

  • आम्ही फायनल रिपोर्टची तयारी केली आहे. ही पूर्णपणे गळफास लावण्याचं आणि आत्महत्येचं प्रकरण आहे.
  •  सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जखमा नव्हत्या. तसेच शरीर आणि कपड्यांसोबत कोणताही संघर्ष झालेलाही दिसला नाही.
  •  बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसेच एम्स टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाही.
  •  गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळेच होता. यापूर्वी सुशांतचं शवविच्छेदन करणार्‍या कूपर इस्पितळाच्या पॅनेलने सुशांतचा मृत्यू आत्महत्यनेच झाल्याचं म्हटलं      होतं.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोमार्फत होत आहे. आतापर्यंत अनेक ड्रग्ज डीलर्सना अटक करण्यात आलेली आहे.

Related posts

कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

13 लाख 86 हजार कामगार कामावर रुजू ; उद्योगमंत्री सुभाष देसाई

Vishal Khandagale

Leave a Comment