कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात “227 सायबर गुन्हे” दाखल !

Pune City News :- टाळेबंदीच्या काळात या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगार व समाजकंटकांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून, राज्यात आतापर्यंत 227 गुन्हे दाखल केल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत 227 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 8 गुन्हे अदखलपात्र आहेत.

जिल्हा निहाय गुन्हे :
बीड : 26,
पुणे ग्रामीण : 17,
मुंबई : 16,
कोल्हापूर : 15,
जळगाव : 13,
सांगली : 10,
नाशिक ग्रामीण : 10,
जालना : 09,
सातारा : 08,
नाशिक शहर : 08,
नांदेड : 07,
परभणी : 07,
ठाणे शहर : 06,
नागपूर शहर : 05,
सिंधुदुर्ग :05,
नवी मुंबई : 05,
सोलापूर ग्रामीण : 05,
लातूर :05,
बुलडाणा : 04,
पुणे शहर :04,
गोंदिया : 04,
सोलापूर शहर : 03,
रायगड : 02,
उस्मानाबाद : 02,
ठाणे ग्रामीण : 01,
धुळे : 01 यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सायबरच्या विश्लेषणानुसार आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 104 गुन्हे दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 75, टिकटॉक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी 3 तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी 39 गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत 46 आरोपींना अटक केली असून आक्षेपार्ह पोस्टपैकी 31 पोस्ट्स काढण्यात सायबर विभागाला यश आले आहे.

Related posts

कोरोना : पुण्यात आज 6 जणांचा मृत्यू !

Vishal Khandagale

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केल्या अनेक मोठ्या घोषणा

Vishal Khandagale

ब्रेकिंग! दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX