Pune City News :- देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज दिवसभरात कोरोना विषाणू मुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
दुपारपर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या आता ६ वर पोहचली आहे.त्यामुळे पुणे शहरात आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या आता २४ झाली आहे.
तसेच मुंबईतही करोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.मुंबईत आज एकाच दिवशी करोनाचे ७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत शहरात करोनामुळे ९ जण दगावले आहेत. याशिवाय विविध रुग्णालयांत दाखल असलेले ६ करोनाबाधीत आज पूर्णपणे बरे झाले आहेत.

