राष्ट्रीय

मान्सूनची केरळ किनारपट्टीवर धडक

नैऋत्य मोसमी पावसाने केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी याबाबतची माहिती दिली. पुढच्या चार महिन्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या 75 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इशारा : दुसरीकडे राज्यातही पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि उर्वरित राज्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

कमी दाबाचं क्षेत्र : राज्यात सध्या पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कोकणसह राज्यातील विविध भागात पूर्व मोसमी पाऊस कोसळणार आहे.

शक्यता : आयएमडीने 1 जूनला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर 2 जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

अतिवृष्टी : 3 व 4 जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. तर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.

Related posts

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

Vishal Khandagale

ऑनलाईन, सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे आयोजन

Vishal Khandagale

चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX