महाराष्ट्रराष्ट्रीय

मुंबईतून पहिली एक्स्प्रेस रवाना

लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली रेल्वेसेवा पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून देशभरात 200 विशेष ट्रेन धावणार असून पहिली विशेष ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून उत्तर प्रदेशमधील वाराणसीसाठी रवाना झाली.

पहिला मान : विशेष ट्रेनचा पहिला मान सीएसएमटी येथून वाराणसीला जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेस गाडीला मिळाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर 12 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन रवाना झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करत ही ट्रेन सोडण्यात आली.

आभार : थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला. सर्व प्रवाशांना मास्क लावूनच प्रवास करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, या सुविधेबद्दल प्रवाशांनी रेल्वेचे आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यालाच अनलॉक-1 असेही म्हटले आहे. यामध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. त्यात विशेष ट्रेनची सुविधा महत्त्वाची आहे.

आजपासून या 200 विशेष ट्रेन धावत आहेत. आज पहिल्याच दिवशी 1.45 लाखांहून अधिक प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणार आहेत.

Related posts

महाराष्ट्रात 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

Vishal Khandagale

चिनी कंपनीला दिलेले 500 कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Vishal Khandagale

पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद १५ जुलै पासून

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX