महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

धमकी  मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे.

फोन दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली.

सुरक्षा वाढवली अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आरोप दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

Related posts

कोरोना: महाराष्ट्रात दुसरा बळी !

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.