पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना: महाराष्ट्रात दुसरा बळी !

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे.
राज्यात कोराना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 64 होती. मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.मृत व्यक्ती परदेशातून आली होती. या व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. अखेर आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुंबईत आज नव्याने 6 तर पुण्यात 4 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी कोरोनाचा पहिली बळी मुंबईतील कस्तुरबामध्ये 64 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यु झाला होता.

Related posts

48 हजार डोस उपलब्ध ; येथे होणार लसीकरण

Vishal Khandagale

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९३३६ वर

Vishal Khandagale

आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX