महाराष्ट्र

मुख्यमंत्री ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पंतप्रधान मोदींच्या ध्येय धोरणांवर टीका करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमची कायम निरोगी व तंदुरूस्त राहा हीच प्रार्थना.

दीर्घायुष्यासाठी सदिच्छा”, असे ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

Related posts

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांचे मोठे विधान

Vishal Khandagale

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट

Vishal Khandagale

“WhatsApp’s Group Admin” संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.