गुन्हे विषयकपिपरी चिंचवड

युट्युबवर व्हिडीओ पाहून घरीच छापल्या नोटा..

crime

आजच्या मोबाइलच्या युगात जग फार पुढे गेले आहे. मोबाइलवरून अनेक उद्योग करताना नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. यातच पिंपरी चिंचवड शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. बहीण आणि भावाने चक्क युट्युबवर व्हिडीओ पाहून घरच्या घरी खोट्या नोटा छापल्या आहेत.

इतकेच नाही तर या खोट्या नोटा बाजारात खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला ताब्यात घेतले आहे.

सुनीता रॉय आणि दत्ता प्रदीप रॉय या भावंडांना अटक झाली आहे. छापलेल्या खोट्या नोटा खपवण्यासाठी ते स्थानिक मार्केटमध्ये प्रयत्न करत होते. भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या ३४ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी सुनीता आणि दत्ता हे दोघेजण यूट्युबवर व्हिडीओ पाहून घरातच खोट्या नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद जमा केले होते.

भोसरी गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत पोलिसांनी शंभर रुपये दराच्या ३४ नोटा, दोन प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण ३४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

Related posts

पुण्यात २२ पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने सन्मान !

Vishal Khandagale

विघ्नहर गणपती मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक

Vishal Khandagale

दुहेरी हत्याकांडाने दापोडी हदरले !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX