गुन्हे विषयक

तरुणीला पहिल्या मजल्यावरून फेकले

उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणीला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर भीमराव तुपे (वय 31, रा. सतरानळी, हडपसर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 26 वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर याने एका तरुणीकडून 40 हजार रुपये हातउसने घेतले होते. परंतु तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी (दि.4) सागर संबंधित तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्या तरुणीने त्याला पुन्हा पैशाची मागणी केली, मात्र तिने नकार दिला असता, त्याने चिडून जाऊन त्याने तिच्याशी वाद घातला आणि तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवीगाळ केली.

त्या तरुणीने याची तक्रार आपल्या बहिणीकडे केली. त्यामुळे चिडून सागरने त्या युवतीला पहिल्या मजल्यावर असलेल्या घरातून तिला खाली ढकलले. यात फिर्यादी तरुणीचा डावा पाय, मणका, खुबा फ्रॅक्चर झाला. पोलिसांकडून आरोपी सागर यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव करीत आहेत.

Related posts

एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग

Vishal Khandagale

बुधवार पेठेत तडीपार गुंडाने केला पोलीस हवालदाराचा खून

Vishal Khandagale

एक कोटींचा गांजा, ७५ लाखांचे चरस जप्त

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX