Pune City News
पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्च्याचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा क्रांती मोर्चा व संलग्न संघटनांकडून आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन सूरु असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी प्रशासन आणि पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात काळे झेंडे दाखवून आणि सरकार विरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

त्यानंतर पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाने मराठा आरक्षण स्थगिती विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, राजेंद्र कुंजीर, सचिन अडेकर, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, अमर पवार, युवराज दिसले, अश्विनी खाडे, सारिका जगताप उपस्थित होते.

Related posts

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे’- महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

9 हजार कोटी द्या; मग गावे समाविष्ट करा : महापौर

Vishal Khandagale

पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी दुरुस्ती कारणास्तव बंद !

Vishal Khandagale

Leave a Comment